Wednesday, April 15, 2009

राज ठाकरेंनी नाशिक मुक्कामी मराठी माणसांसाठी हाक मारली

राज ठाकरेंनी नाशिक मुक्कमी मराठी माणसांसाठी हाक मारली
raaj in nashik

नाशिक दि. १३ एप्रिल ०९ (मि.पा. विशेष प्रतिनिधी ) : तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र उभा करण्यासाठी मनसे ला आपले मत द्या असे अवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी केले.मनसेच्या नाशकातील उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ पवननगर - नाशिक येथील मैदानावर राज ठाकरे यांची सभा झाली. यावेळी त्यांनी शिवसेनेवरही टीकास्र सोडले.

शरद पवारांना हि निवडणुक लढवायची नव्हती. पण ते कार्यकर्त म्हणतात म्हणुन निवडणुक निवडणुक लढवायची आहे असे सांगत आहेत. शरद पवार व शिवसेनेची युती आहे. जेथे जेथे राष्ट्र्वादीचा बलाढ्य उमेदवार उभा आहे तेथे तेथे शिवसेनेने आपला कमकुवत उमेदवार उभा केला आहे. शरद पवारांना एकेकाळी नाशिक जिल्ह्याने चौदाच्या चौदा आमदार निवडून दिले होते. या जिल्ह्याने पवारांवर भरभरून प्रेम केले. त्यावेळी पवार म्हणाले होते की, मी नाशिकचा पालकमंत्री बनून काम करेन. पण तुम्ही बारामतीचा विकास बघा आणि नाशिककडे बघा, असे ते म्हणाले.

मागच्या मनसे च्या आंदोलनात पोलीसांनी मराठीच माणसांवर अत्याचार केले. मालेगावात तर तुरूंगात मनसेंच्या कार्यकर्त्यांना लघवीतुन रक्त येईपर्यंत मारले. तेव्हा ग्रुहमंत्री मराठीच होता. मराठी मंत्र्यांनी मराठी माणसांसाठी काहीच केले नाही. मागील वर्षात रेल्वे ने २७०० लोकांना नोकर्‍या दिल्या. त्यात मराठी मुले किती? फक्त २७. तिकडे लालू पाटण्याहुन प्रत्येक ठिकाणी जाणारी रेल्वे सुरु करतो. तुमच्या नाशिक मधुन किती रेल्वे गाड्या चालू झाल्या? माहित नाही.

मला लाल दिव्याच्या गाडीचे आकर्षण नाही. असे त्यांनी प्रतिपादन केले. मराठी माणसाच्या कल्याणासाठी तुम्ही रेल्वे ईंजीनावर शिक्का मारुन मनसेचे उमेदवार विजयी करा असे आवाहन केले.

सभेच्या समोरील पाण्याच्या टाकीवरील एक माणुस 'राज ठाकरे झिंदाबाद', असे ओरडला असता, 'अरे, हा तर धर्मेंद्र दिसतोय' असे बोलुन त्यांनी हशा घेतला.

व्यासपीठावर सर्वश्री. वसंत गीते, उत्तरा खेर, अतुल चांडक, नितीन नाना भोसले, सुहास आण्णा कांदे, मोहन आण्णा मोरे, प्रकाश भालके, ज्योतीताई शिंदे, हिरे ताई, सुजाता डेरे, गोरख बोडखे, नितीन माळी व उमेदवार हेमंत गोडसे उपस्थीत होते. सभेस तोबा गर्दी असल्याने मैदान छोटे पडल्याने लोकानी रस्त्यावर, बाजुच्या इमारतींच्या छतांवर उभे राहुन सभेचा आनंद घेतला.

(खाली काही सभेतील फोटो व व्हि.डि.ओ. क्लिप्स आहेत. बघा.)

राज ठाकरेंची नाशिक - पवननगर येथील सभा.

राज ठाकरेंची नाशिक - पवननगर येथील सभा.

राज ठाकरेंची नाशिक - पवननगर येथील सभा.

राज ठाकरेंची नाशिक - पवननगर येथील सभा.

राज ठाकरेंची नाशिक - पवननगर येथील सभा.

राज ठाकरेंची नाशिक - पवननगर येथील सभा व्हि.डि.ओ. क्लिप्स १

राज ठाकरेंची नाशिक - पवननगर येथील सभा व्हि.डि.ओ. क्लिप्स २

No comments: