Wednesday, April 15, 2009

शेतीविषयक सल्ला :- कपाशीवरील बोंड अळी -लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय

शेतकरी बंधूंनो पाषाणभेद चा नमस्कार.

आज आपण 'आपली माणसं व त्यांची माती ' या कार्यक्रमात "कपाशीवरील बोंड अळी -लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय" याविषयावर तांबडवाडीचे प्रगतीशील शेतकरी श्री. भाऊराव गव्हाणे यांचे विचार एकणार आहोत.

पाषाणभेद: नमस्कार भाऊराव.

भाऊराव: रामराम.

पाषाणभेद: भाऊराव, आपण उस ह्या पिकाबरोबरच कपाशी हे मुख्य नगदी पिक घेतात. आपल्या भागात कपाशीवरील रोगांमध्ये 'कपाशीवरील बोंड अळी' ह्या रोगाची समस्या फार मोठ्या प्रमाणात उद्धभवते. याविषयी आपण काय सांगाल?

भाऊराव: कपाशीवर पाने खाणारी अळी, मर रोग, मावा, तुडतूडे, खोड पोखरणारे भुंगे तसेच बोंड अळी या रोगांचा प्रार्दुभाव होतो. त्यापैकी बोंड अळी ही फारच किचकट असते. जेव्हा पिक हाताशी येत असते त्या वेळेसच हिचा प्रार्दुभाव होतो. शेतकरी बांधवांनी वेळीच उपाययोजना केली नाही तर पिक हातचे जाते.

पाषाणभेद: आता ह्या अळीची लागण झाली हे कसे कळते?

भाऊराव: कपाशी साधारणता: ७० दिवसांची झाली की सुरवातीस पानांवर खसखशीसारखे दाणे दिसतात. त्यावर दुर्लक्ष झाले की ते दाणे ४ दिवसात फुगतात. नंतर त्यातुन बारीक किडे बाहेर पडतात.हे किड नंतर अळीत रुपांतरीत होते. कपाशीचे पाने खावुन ही अळी मोठी होते. ती पुन्हा अंडी देते. तो पर्यंत कपाशी नाश झालेली असते.

******************** कर्मशियल ब्रेक ************************
टिंग. टिंग.तो: आगं, सगुने, आवंदा ज्वारी तर लई झ्याक झाली पध.
ती: तर ओ धनी, आपन आवंदा शेवंता-१ बी.टी. ज्वारी पेरली नव्ह का?
टिंग. टिंग. डि. डिंग.
*********************************************************

पाषाणभेद: अशा ह्या नुकसानकारक अळीचे नियंत्रण केव्हा आणि कसे करावे?

भाऊराव: मागे सांगीतल्याप्रमाणे कपाशी साधारणता: ७० दिवसांची झाली की सुरवातीस पानांवर खसखशीसारखे दाणे दिसतात. याच वेळेस अळीचे नियंत्रण करणे शक्य असते. काही कारणामुळे त्यावर दुर्लक्ष झाले की मग त्यावर उपाय कठीण असतो.

पानांवर खसखशीसारखे दाणे दिसताच किडग्रस्त पाने काढून जमीनीत पुरुन टाकावीत. पाण्यात विद्राव्य असणारे मोनोक्रोटोफॉस्ट २३%, ५० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यातुन हे़क्टरी ८० लिटर, २ दिवसांच्या अंतराने फवारावे.

पाषाणभेद: बर, आता वेळीच उपाययोजना न झाल्यास काय उपाय आहेत?

भाऊराव: वेळीच उपाययोजना न झाल्यास अंड्यांतुन अळी बाहेर पडुन पाने खावु लागते. बोंड अळी च्या नियंत्रणासाठी, निंड्रॉजेन-५०, 10 लिटर पाण्यात 10 मिली आणि मॅलेथिऑन ३% (वरील 10 लिटर पाण्यात ५ मिली ), किंवा बेंन्झोट -पी ३५%, २० लिटर पाण्यात विरघळुन हेक्टरी ७० लिटर, १ दिवसाआड, सकाळच्या वेळी फवारावे. रोगाच्या नियंत्रणास कार्बारील २०% वापरु नये.

१० दिवसाच्या अंतराने हिच उपाययोजना ४ दिवसाआड करावी.

पुढील कपाशीच्या पिकात बोंड अळी चा प्रार्दुभाव होउ नये म्हणुन या हंगामानंतर जमीनीत शेवग्याची लागवड करावी.

पाषाणभेद: भाऊराव, आपल्या शेतकरी बाधवांना आपण 'कपाशीवरील बोंड अळी च्या नियंत्रणाची' फार मोलाची माहीती दिली त्याबद्दल मी **शवाणीच्या तर्फे आभारी आहे.धन्यवाद.

भाऊराव: धन्यवाद.

(वरील मुलाखत दि. १७ मार्च सायंकाळी ७:३५ वाजता **शवाणी च्या *** केंद्रावरून प्रसारीत झाली होती. )

No comments: